मुंबई – काही वर्षांपूर्वी ‘ओरु अदार लव’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर साऊथ अभिनेत्री “प्रिया प्रकाश वॉरिअर’ चांगलीच चर्चेत आली होती. या चित्रपटातील तिचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये प्रियाने केवळ डोळा मारला होता. मात्र, तिची ही स्टाइल नेटकऱ्यांना प्रचंड भावली होती.
View this post on Instagram
आज प्रिया सर्वत्र सोशल मीडिया सेंसेशन म्हणून ओळखली जाते. इंस्टाग्रामवर तिचे लाखोंच्या संख्येत फॉलोवर्स आहेत. प्रिया सतत आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करते असते. फॅन्सला सुद्धा तिच्या फोटो- व्हिडिओला मोठी पसंती देतात.
View this post on Instagram
नुकतंच, अभिनेत्री “प्रिया प्रकाश वॉरिअर’ने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर काही फोटो शेअर केले असून यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. इतकंच नाही तर तिचा लूक प्रचंड चेंज झाल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
प्रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती दुबईमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच तिने वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे. सोबतच केस मोकळे सोडल्यामुळे ती आणखीच ग्लॅमर्स दिसत आहे. फॅन्सकडून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळत आहे.