मुंबई – करोनाच्या काळात देशातील अनेक गरजुंच्या मदतीसाठी धावून येणार अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महामारीच्या काळात अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमांतून सोनू सूदला मदत मागितली होती यावेळी सोशलवर सोनूच्या मदतीचे विषय चांगलेच चर्चेत होते.
अशातच सोनूला त्याच्या चाहत्या केलेल्या ट्विटची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. एक चाहत्याने त्याला मिम्स टॅग करत विचारले आहे. थंडीमध्ये ब्लॅंकेट दान करणारे आता उन्हाळ्यात थंड बियर नाही देणार का? या टॅग केलेल्या ट्विट ला सोनूनेही मजेदार उत्तर दिलं.
सोनू सूदने लिहिले आहे की, बियरसोबत शेव (भूजिया) चालेल का? सोबतच हसणारा इमोजी देत हे ट्विट टॅग केले आहे. सोनूचा चाहत्या वर्गाने यावर कॉमेंट्स वर्षाव केला असून या ट्विटला युजर्सची चांगलीच पसंती मिळाली आहे.
बियर के साथ भुजिया चलेगा ? 🤣 https://t.co/SX3rEtoYgL
— sonu sood (@SonuSood) April 6, 2022
दरम्यान, या महामारीच्या काळात देशभरातील गरजूंना मदत करणारा दानशूर अभिनेता सोनू सुदचे काम पाहून अनेक फॅन्सने त्याला पंतप्रधान बनण्याची मागणी केली होती. सोनू सूदच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं झाल्यास तो आगामी काळात पृथ्वीराज चित्रपटात दिसणार असून यातमध्ये अभिनेत्री मानुषी छिल्लर आणि अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत.