नाशिक : नाशिक शहरातल्या गांधी नगर इथे विमानाने पॅराशूटद्वारा खाली उडी मारण्याचे प्रात्यक्षिक करताना बाभळीच्या झाडामध्ये पॅरेशूट अडकल्याने अडकून पडलेल्या जवानाची सुटका अग्निशामक दलाने केली.
हनिफ नापा असे त्याचे नाव असून त्याचे पॅराशूट उपनगर इथल्या एका बाभळीच्या झाडावर अडकले. त्याला काट्याकुट्यात अडकावे लागले आणि अखेर नाशिकमहापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अखेर झाड तोडून त्याची सुटका केली. आज सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार घडला.
आर्टिलरी सेंटर इथल्या प्रशिक्षण केंद्रात विमानाने पॅराशूटद्वारा उतरण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. आजसकाळी एका विमानातून अनेक जण असे प्रशिक्षण घेत होते. 13 हजार फुटांवर असताना हनिफनापा पॅराशूटद्वारा उतरत असताना जोरदार वारा सुटल्याने त्याचे पॅराशूट भरकटले. उपनगरातीलएका शेतातल्या बाभळीच्या झाडावर तो अडकला. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन झाड तोडले.