narendra modi : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ( Election Results 2023 ) आज समोर येतोय. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीगडमध्ये भाजपला मोठा विजय मिळताना दिसतोय, तर काँग्रेसच्या हातून राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता निसटताना दिसत आहे. याशिवाय मध्य प्रदेशातही काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसतोय. फक्त तेलंगणात काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे.
निकालाच्या समोर आलेल्या आकडेवारीवर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( narendra modi ) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या आकडेवारीवर मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले असल्याचं पाहायला मिळत आहे.
जनता-जनार्दन को नमन!
मध्य प्रदेश, राजस्थान और छत्तीसगढ़ के चुनाव परिणाम बता रहे हैं कि भारत की जनता का भरोसा सिर्फ और सिर्फ सुशासन और विकास की राजनीति में है, उनका भरोसा @BJP4India में है।
भाजपा पर अपना स्नेह, विश्वास और आशीर्वाद बरसाने के लिए मैं इन सभी राज्यों के परिवारजनों…
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2023
पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर असल्याचे दिसून येत आहे. भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी या सर्व राज्यातील कुटुंबातील सदस्यांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो.
मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू. त्यानिमित्त पक्षाच्या सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही सर्वांनी एक सुंदर उदाहरण मांडले आहे. तुम्ही भाजपची विकास आणि गरीब कल्याणकारी धोरणे ज्या पद्धतीने लोकांमध्ये नेली त्याचे कौतुक करता येणार नाही.
विकसित भारताचे ध्येय घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्हाला थांबायचे नाही आणि खचून जायचे नाही. आपल्याला भारताला विजयी करायचा आहे. आज आम्ही एकत्रितपणे या दिशेने एक मजबूत पाऊल उचलले आहे.’ या आशयाचे ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे.