Shubman Gill won the sports Leader of the year award – भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याला स्पोर्टस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने रविवारी सन्मानित करण्यात आले. एका वाहिनीतर्फे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
२०१८ साली पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते, त्यात गिलच्या कामगिरीचा मोठा वाटा होता. त्यानंतर वरिष्ठ भारतीय संघात त्याचा समावेश झाला. गिलने त्यानंतर मागे वळून पाहीले नाही व आज तो भारतीय संघाचा विराट कोहलीसह प्रमुख फलंदाज म्हणून गणला जातो.
नियमित कर्णधार रोहित शर्मासह तो डावाची सुरुवात करतो. त्याने एक सलामीवीर फलंदाज म्हणून २०१९ साली भारतीय संघात पदार्पण केले. त्यात न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतकी खेळीही केली. एकदिवसीय सामन्यांत द्विशतक फटकावणारा गिल सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याच्या या आजवरच्या कामगिरीबद्दलच त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.