नरेंद्र मोदी आज सरकार स्थापनेचा दावा करणार ?

नवी दिल्ली- २०१९ लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर आज दिल्लीत भाजप आणि एनडीच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. ही बैठक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी संध्याकाळी ७च्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार असून, सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे समोर आले आहे. मात्र, अजून तरी भाजप कडून या बातमीला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज १६ वी लोकसभा विसर्जित करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली असून, त्यानंतर आता १७ व्या लोकसभेची स्थापना करण्याची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, काल रात्री दिल्लीत केंद्रीयमंत्री मंडळाची बैठक पार पडल्यानंतर मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून, मोदींनी आपल्या पंतप्रधान पदा बरोबरच आपल्या मंत्रीमंडळाचा सुध्दा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्त केला. मात्र, यावेळी राष्ट्रपतींनी मोदींचा राजीनामा स्वीकारला असून, मोदींना नवीन सरकार प्रस्थापित होईतो पर्यंत आपले कामकाज चालू ठेवण्याची विनंती केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here