Narendra Modi – हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली असून नेतान्याहू यांनी सद्यस्थितीची माहिती दिली आहे.
मोदी म्हणाले की, भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. यावेळी भारत इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. यापूर्वी, इस्रायलचे माजी पंतप्रधान आणि विद्यमान विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनी सोमवारी आपल्या देशाला पाठिंबा दर्शविल्याबद्दल भारताचे आभार मानले होते.
गाझावर सत्ताधारी पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमासने शनिवारी सकाळी इस्रायलच्या दक्षिणेकडील भागांवर अचानक आणि अभूतपूर्व हल्ला केला. यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तर देत गाझा पट्टीवर अनेक हवाई हल्ले केले.
एका मुलाखतीत जेव्हा लॅपिड यांना हमासच्या या हल्ल्यांना इस्रायल कसा प्रतिसाद देईल असे विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले होते की, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही हमासला वाढण्यापासून रोखू आणि महिला, मुले आणि दहशतवाद्यांवर होणारे हल्ले थांबणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
दरम्यान, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले आहेत की हे खूप कठीण होणार आहे आणि आम्हाला धीर धरावा लागेल. मात्र या कठीण काळात इस्रायलला पाठिंबा दर्शविल्याबद्दल मी पंतप्रधान (नरेंद्र) मोदी आणि त्यांच्या सरकारचे आभार व्यक्त करू इच्छितो.”
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलशी एकता व्यक्त करताना पंतप्रधान मोदी शनिवारी म्हणाले होते, “इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. आमचे विचार आणि प्रार्थना निष्पाप बळींच्या कुटुंबीयांसोबत आहेत. आम्ही इस्रायलसोबत एकजुटीने उभे आहोत.