ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live Cricket Score : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज लखनौच्या एकना स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषक 2023 चा 10 वा सामना खेळला जात आहे.आफ्रिकन संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आता ऑस्ट्रेलिया विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेला विजयाची मालिका सुरू ठेवायची आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
डी कॉकचे शतक…
दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने 90 चेंडूत शतक झळकावले. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्ध 100 धावांची इनिंग खेळली होती. डी कॉकने षटकारासह आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 19 वे शतक होते. शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या डी कॉकसाठी ही स्पर्धा खास होत आहे.
Back to back centuries for Quinton de Kock in #CWC23 🤩@mastercardindia Milestones 🏏#CWC23 #AUSvSA pic.twitter.com/Dc6eBS65w4
— ICC (@ICC) October 12, 2023
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा 32 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 181 धावा आहे. सध्या डी कॉक 100 चेंडूत 107 धावा तर एडन मार्करम पाच धावांवर फलंदाजी करत आहे.