Nanded Hospital Death – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात मागील 24 तासांत (9 ते 10 ऑक्टोबर) एका नवजात बालकासह सात रुग्णांचा मृत्यू झाला. यात नवजात बालिका व प्रौढ 6 (पुरुष 2, महिला 4) यांचा समावेश आहे. त्यामुळे आता गेल्या दहा दिवसांत मृतांची संख्या 113 वर पोहोचली आहे.
24 तासांत 191 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. सद्य:स्थितीत 722 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. तसेच 857 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. 149 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण 49 शस्त्रक्रिया झाल्या.
यात 40 रुग्णांवर मोठ्या, तर 9 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 26 प्रसूती करण्यात आल्या. यात 11 सीझर, तर 15 नॉर्मल प्रसूती झाल्या, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश मनूरकर यांनी दिली आहे.