Nanded Hospital Death : नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यूचे प्रकरण (Nanded Hospital Death) आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. आज या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. रुग्णांच्या मृत्यूशी संबंधित खटल्यात महाराष्ट्र सरकारच्या वतीने अॅडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ युक्तिवाद करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर राज्य सरकारकडून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे (Nanded Hospital Death) प्रकरण गंभीर सध्या बनत चालले आहे. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारपर्यंत मृतांची संख्या 24 होती तर आणखी सात रुग्णांचा नंतर मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 31 मृतांपैकी 16 अर्भक असल्याचे सांगण्यात येत आहे.
नांदेडच्या रुग्णालयात झालेल्या मृत्यूंबाबत (Nanded Hospital Death) महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. याची दखल घेत उच्च न्यायालय आदेश देणार आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने राज्य सरकारच्या अहवालात काय म्हटले आहे ते सांगितले. या अहवालात असे म्हटले आहे की, काही रुग्णांचे प्राण वाचू शकले नाहीत कारण त्यांना खाजगी रुग्णालयांनी उशीरा रेफर केले होते. त्यासोबतच सर्व औषधे आणि इतर पुरवठा उपलब्ध होता आणि प्रोटोकॉलनुसार उपचार केले गेले. राज्य सरकारनेही वैद्यकीय आयोगाच्या अहवालातील एक मुद्दा मांडला.
वैद्यकीय आयोगाप्रमाणे नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Nanded Hospital Death) अधिक मनुष्यबळ आणि नवीन एनआयसीयूची गरज असल्याचे सरकारी अहवालात म्हटले आहे. 97 पदांपैकी केवळ 49 पदे भरली असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या अहवालावर न्यायालय आपला निर्णय देणार आहे.