18 पैकी 13 प्रवासी,करबला भागातील 3 तर कुंभार गल्ली येथील 1 रुग्ण
नांदेड(प्रतिनिधी) – दिनांक 14 मे 2020 रोजी व दिनांक 15 मे 2020 रोजी पाठविण्यात आलेल्या स्वब पैकी 41 रुग्णाचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये एकूण 18 रुग्ण हे पॉझिटिव आढळून आले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 84 झाली आहे.
आज एकूण 18 पॉझिटिव रुग्णांपैकी 13 रुग्ण प्रवासी आहेत. तर 4 रुग्ण करबला भागातील असून 1 रुग्ण हा कुंभार गल्ली सराफा भागातील आहे सदरील रुग्ण हे यात्रीनिवास एन.आर.आय. भवन व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे औषध उपचार घेत आहेत. सध्यस्थितीत यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेणे चालू आहे.
एकूण 84 रुग्णांपैकी 26 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 51 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉक्टर शंकराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, पंजाब भवन को बीड केअर सेंटर व यात्री निवास केअर सेंटर येथे 41 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळा कोविंड केअर सेंटर मध्ये 1 रुग्ण तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे 1 रुग्णावर औषध उपचार सुरू आहे.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण पाच रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे सदर आजाराने बाधित रुग्णाची विशेष काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
तरी जनतेने अफवावर विश्वास ठेवू नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवताली कोरोना बाधीत व्यक्ती असल्यास आपणास सदरील ॲप्स सतर्क करण्यात मदत करते.