पुसेगाव, (प्रतिनिधी) – बुध ता. खटाव येथील श्री नागनाथ विद्यामंदिरमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी (एन एम एम एस ) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थिनींनी गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तन्वी विकास पात्रेकर, श्रेया वैभव लोहार, अस्मिता चंद्रकांत चव्हाण या विद्यार्थिनींनी गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या विद्यार्थिनींना प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती चार वर्ष मिळणार आहे.
तसेच सारथी शिष्यवृत्ती तीर्थ राजेंद्र सूर्यवंशी, यश गणेश माने, श्रेया सखाराम फडतरे, नम्रता शरद सातपुते, समीक्षा गजानन जगदाळे, श्रद्धा दत्तात्रय फडतरे, अनुजा जालिंदर फडतरे, श्रेया नितीन जाधव, पूर्वा किरण जगताप, प्राजक्ता विशाल गोडसे 77, सिद्धी हनुमंत फडतरे,
श्रीकांत संतोष फडतरे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9600रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच मंथन बाह्य स्पर्धा परीक्षा यामध्ये देखील विश्वजीत नाना दडस, जगदाळे जान्हवी व श्रेया वैभव लोहार राज्यात,जिल्हयात व केंद्रात स्थान मिळवले आहे, सर्व विद्यार्थी मंथन परीक्षेत यशस्वी झाले.
याबद्दल विद्यार्थिनीचे प्राचार्य अंकुश भांगरे ,पर्यवेक्षक संजय कांबळे, सरपंच सौ सुजाता बोराटे, उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विभागप्रमुख भगवान सरवदे, नाना दडस, माधुरी चव्हाण, नितीन नारागुडे , तानाजी पाटील, खाडे यांचे मार्गदर्शन लाभले. या परीक्षेत 37 विद्यार्थी बसले त्यापैकी 30 विद्यार्थी पात्र झाले आहेत.