Ravindra Dhangekar And Vasant More | Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणूक लागल्या असून आता सर्वपक्षाने आपल्या उमेदवारांना रिंगणात उभे केले आहे. त्यातच राज्यातही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे.
पुण्यातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ आणि वंचित आघाडीकडून वसंत मोरे अशी लढत रंगणार आहे. Ravindra Dhangekar And Vasant More
भाजपने त्यांच्या दुसऱ्या यादीत पुण्याची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसने दि. २१ मार्च रोजी सात जागांची उमेदवारी जाहीर केली होती, त्यात एक नाव पुण्यातील रवींद्र धंगेकर यांचे होते.
पुणे लोकसभा मतदार संघात तिहेरी लढत होणार आहे. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही तगडे नेते मानले जात आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे. तिघांच्या प्रचारासाठी महत्वाचे नेते मैदानात उतरले आहेत.
दरम्यान, असं असताना देखील रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे या दोघं विरोधकांनी तिसऱ्या विरोधकाच्या प्रभागात जाऊन मिसळीवर ताव (नाश्ता) मारल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ वसंत मोरे यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “सुसंस्कृत पुणे, आज रविभाऊ आणि मी, मुरलीआण्णा मोहळ यांच्या प्रभागात कोथरूड येथे सकाळी नाष्टा केला…’असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे. । Ravindra Dhangekar And Vasant More | Lok Sabha Election 2024 :