कोपरगाव – रवंदे ग्रामपंचायतने उभारलेल्या शिवपार्वती व्यापारी संकुलाचे उद्घाटन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्याहस्ते करण्यात आले.
विवेक कोल्हे म्हणाले की, रवंदे ग्रामपंचायत नेहमीच विकासाच्या पातळीवर गतिमान कामे करण्यात अग्रेसर आहे. नूतन व्यापारी संकुल हे बाजारपेठेची चालना ठरेल. काही काळातच जवळपास १६ कोटींचे कामे करणे हे कौतुकास्पद आहे.विविध स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करताना सरपंच कै.भानुदास भवर यांचे स्मरण या निमित्ताने केले गेले. रवंदे हे प्रगतिशील शेतकरी असणारे गाव आहे.
अनेक भविष्यकालीन बदल साकारून नैसर्गिक असमतोलाला सामोरे जाण्यासाठी योग्य पावले टाकली जात आहेत. आपला व्यवसाय हा काळासोबत गतिमान होण्यासाठी शेती ते उद्योगपती हा प्रवास शक्य आहे. रवंदे गावच्या विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा देत आगामी काळात नावीन्यपूर्ण उपक्रमात सहकार्याची भावना विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कोल्हे कारखाना उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक नीलेश देवकर, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, विलासराव जगझाप, अशोकराव भाकरे, अशोक काळे,जयराम गडाख, धोंडीबा सांगळे, माजी सभापती सुनील देवकर, श्रीकांत चांदगुडे, राहुल वाणी, माजी सभापती विजय साळुंके, सुभाष दवंगे, आकाश वाजे,
साहेबराव लामखडे, बाबासाहेब कंक्राळे, शांताराम कदम, केशव कंक्राळे, निवृत्ती सोनवणे, राधाकिसन कंक्राळे ,दीपक कदम, शिवाजीराव कदम, उपसरपंच संदीप कदम, शोभा कंक्राळे, ऋषिकेश कदम, मंगल सोनवणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बागले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.