नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 115 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 66 हजार 970 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.04 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 84 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 999 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 18, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 32 आणि अँटिजेन चाचणीत 34 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 4, कर्जत 4, पारनेर 1, पाथर्डी 5, राहाता 1, संगमनेर 2, कॅन्टोन्मेंट बोर्ड 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 7, अकोले 2, कर्जत 1, कोपरगाव 3, पारनेर 1, राहाता 13, राहुरी 1, संगमनेर 3, शेवगाव 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 34 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 2, जामखेड 2, कर्जत 6, कोपरगाव 7, नगर ग्रामीण 2, पाथर्डी 1, राहता 1, राहुरी 1, संगमनेर 10, शेवगाव 1, श्रीरामपूर 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 22, अकोले 3, जामखेड 2, कर्जत 5, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 6, नेवासे 11, पारनेर 5, पाथर्डी 8, राहाता 6, राहुरी 4, संगमनेर 19, शेवगाव 2, श्रीरामपूर 2, कॅन्टोन्मेंट बोर्ड 2, जिल्हा बाहेरील 7, अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या:66970
उपचार सुरू असलेले रुग्ण: 999
मृत्यू:1045
एकूण रुग्णसंख्या:69014