हडपसर(प्रतिनिधी) – मी गेली अनेक वर्षापासून किर्तन रुपी सेवा करत असून, त्यामधून मी समाजप्रबोधनावर जास्तीत जास्त भर देऊन समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे. समाजप्रबोधन ही काळाची गरज आहे, असे मत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केले.
तरवडे वस्ती, महंमदवाडी येथे येथील समाजिक कार्यकर्ते अतुल नारायण तरवडे यांच्या वतीने इंदुरीकर यांचा जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
नगरसेविका रंजना टिळेकर, माजी आमदार बापूसाहेब पठारे,नवनाथ काकडे, पोपट आंबेकर, विनोद आंबेकर, राजेंद्र तरवडे, दीपक जरांडे, म्हस्कु कोंढाळकर, शांताराम जाधव, सोपान लोंढे, नारायण आप्पा डांगे, विजय चव्हाण, भगवान घुले, राजेंद्र जरांडे, संजय जरांडे, संभाजी जरांडे, सुभाष डांगमाळी, पांडुरंग डांगमाळी,बाळासाहेब आंबेकर, नंदू जाधव तसेच अतुल तरवडे मित्र परिवार व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
इंदूरीकर महाराज पुढे म्हणाले की,ज्यांची तुलनाच होवू शकत नाही ,असे समाजिक कार्यकर्ते अतुल तरवडे यांनी आज वाढदिवसानिमित्त सांप्रदायिक रूपाने सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यानिमित्ताने उपस्थित राहून किर्तन रूपाने तुम्हाला जे समाज प्रबोधन करत आहे. ते तुम्हाला निश्चितच दिशा देणारे आहे.
तसेच नेतेमंडळी व गाव पुढारी एकत्र आले तर कोरोना महामारीवर मात करणे फार अवघड नसून, यामुळे शाळा, कॉलेज सुरू होण्यास मदत होईल. त्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावला गेला आहे. तो पुन्हा शैक्षणिक प्रवाहात येईल. यासह अनेक सद्यस्थितीवर दृष्टांत सांगितले. त्याच सोबत आपल्या खास शैलीत विनोद करून उपस्थित भाविक भक्तांना व ग्रामस्थांना हसवले.दरम्यान परिसरातील विविध पक्षांच्या पदाधिकारी यांनी तरवडे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.