मुंबई – बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या नेहमीच अफेअरच्या चर्चा रंगलेल्या असतात. यातच आता ‘जवान’ चित्रपटातील संगीतकार अनिरुद्ध रविचंदर (Anirudh Ravichander) याच्याही अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अनिरुद्ध रविचंदर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेश (Kirti Suresh) हिला डेट करत असल्याचे म्हंटले जात आहे. एवढेच काय तर दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र याबाबत कीर्तीने प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना, कीर्तीने आमच्या अफेअरच्या बातम्या चुकीच्या आहे. अनिरुद्ध माझा चांगला मित्र असल्याचे म्हंटले आहे. तसेच कीर्तिचे वडील सुरेश कुमार यांनीही या लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. एका ओटीटी प्लॅटफॉर्मशी संवाद साधताना या बातम्या निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
अनिरुद्धने शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटामुळे तो चर्चेत आला आहे. दरम्यान, यापूर्वीही अनिरुद्ध व कीर्तिच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. अनिरुद्ध व कीर्तिने ‘रेमो’, ‘थाना सेरंधा कूटम’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्यानंतर अखेर कीर्तीने या अफवा असल्याचे म्हणत चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.