बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ज्येष्ठ गायक सोनू निगम यांनीही बॉलीवूडच्या संगीत उद्योगात माफिया असल्याचे आणि युवा गायकांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. सोनू निगमने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने इंडस्ट्रीतील संगीत माफियाविषयी चर्चा केली आहे.
सोनू निगम म्हणातो, हे संगीत माफिया नवीन आणि प्रतिभावान गायकांच्या कामात अडथळा आणतात. बऱ्याच मोठ्या संगीत दिग्दर्शक आणि गायकांकडून काम काढून घेण्यात आले, कारण काही मोठ्या कलाकारांनी त्यांना काम देण्यापासून रोखले. हे संगीत माफिया चित्रपटांपेक्षा मोठे आहेत.
सोनू म्हणाला, मी खूप कमी वयातच काम करण्यास सुरवात केली. पण आजच्या वातावरणात युवा संगीतकार, लेखक आणि निर्मात्यांसोबत काम करायचे आहे, पण संगीत कंपन्या त्यांच्याबरोबर काम करण्यास नकार देतात. तो म्हणाला की, त्याने स्वत: या सर्वांचा सामना केला आहे, पण आता वातावरण अधिकच वाईट बनले आहे.
दरम्यान, सोनूने बॉलीवूड आणि संगीत इंडस्ट्रीला इशारा दिला की, जर हे सर्व बंद केले नाही तर लवकरच संगीत जगतातसुद्धा आत्महत्यासारखी प्रकरणे दिसू लागतील.