नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतीय हद्दीत घुसणाऱ्या एका पाकिस्तानी ड्रोनला भारतीय जवानांनी पाडले आहे. बीएसएफच्या एका पथकाने कठुआमधील हिरानगर सेक्टरच्या रथुआ परिसरात हे ड्रोन उडताना पाहिले होते. यामध्ये काही हत्यारेही सापडली आहेत.
माहितीनुसार, ड्रोनसोबत एक रायफल, दोन मॅगजीन, ६० राउंड आणि ७ ग्रेनेड बांधलेले होते. काश्मीर खोऱ्यात हिंसाचार चिथावणी देण्याचाही प्रयत्न होत आहे.
Jammu & Kashmir: Weapons recovered from the Pakistani drone shot down by Border Security Force (BSF) personnel in Kathua today. https://t.co/GP0wTMvGCU pic.twitter.com/R1Hl0Ah4Kp
— ANI (@ANI) June 20, 2020
Looking at the kind of weapons that have been recovered, it seems whoever is responsible for this was trying to create a major incident. There is no doubt the drone came from Pakistan: NS Jamwal, Inspector General, Border Security Force (Jammu Frontier) https://t.co/GP0wTMvGCU pic.twitter.com/rSlwJ4WnBq
— ANI (@ANI) June 20, 2020
दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्स आणि सैन्याकडून अशा घुसखोरी व टेहाळणी करणाऱ्या ड्रोनचा वापर, भारतीय जवानांच्या हालचालीवंर लक्ष ठेवण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी केला जात असून, याचाच वापर दहशतवाद्यांना माहिती पुरवण्यासाठी देखील केला जात आहे.