सातारा (प्रतिनिधी) – चेष्टेने लपवलेल्या सायकल लपवल्याचा जाब विचारल्याने मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सातारा शहरालगत वाढे फाटा येथे बुधवारी रात्री घडली. दीपक दय्या (वय २९, सध्या रा. वाढे फाटा. मूळ रा. नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. सूरज निगडे (वय ३५, रा. वाढे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित मूळचा नाशिक जिल्ह्यातील असून तो सध्या वाढे फाटा येथील एका हॉटेलमध्ये काम करत आहे. बुधवारी दारू विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर मृत व संशयित यांची पार्टी सुरू होती. यावेळी मृताची सायकल लपवल्याच्या जाब त्याने संशयिताला विचारला यातून झालेल्या वादाच्या कारणातून खून झाला असल्याचे समोर येत आहे.
बुधवारी रात्री या दोघांसह त्यांचा आणखी एक मित्र सोबत होता. बुधवारी दारु विक्रीसाठी खुली झाल्यानंतर त्यांनी पार्टीचे नियोजन केले. यासाठी महामार्गालगत एका झाडाखाली तिघांनीही दारु पिली. त्यांच्यात सायकल लपवल्यावरून वाद झाला. यातूनच संशयिताने दगड डोक्यात घातला.
या घटनेत सूरज निगडे जागीच ठार झाला. रात्री उशिरा ही घटना समोर आल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, पोलिस हवालदार दादा परीहार, सुजित भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून संशयिताला ताब्यात घेतले.