मुंबई – आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांच्या “गुलाबो सिताबो’ची नवीन रिलीज डेट जाहीर झाली आहे. आता हा सिनेमा पुढच्या वर्षी 17 एप्रिलला रिलीज होणार आहे. पूर्वीच्या नियोजानानुसार हा सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज होणार होता.
त्यानंतर त्याची रिलीज डेट अलिकडे ओढून फेब्रुवारीमध्ये करण्यात आली होती. आता परत एप्रिलच्या 17 तारखेला हा सिनेमा रिलीज करण्याचे ठरले आहे. मात्र आता हा चित्रपट अमेजन प्राइम वीडियो रिलीज होणार आहे. हा चित्रपट 12 जून ला रिलीज होणार आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना हे एकत्र दिसणार आहेत. या कॉमेडी सिनेमाच्या पोस्टरमध्ये आयुष्मान एक मध्यमवर्गीय युवक दिसतो आहे. तर अमिताभ बच्चन हे अतिशय गरिब आणि थोडेसे मोठे नाक असलेल्या वृद्ध माणसाच्या रोलमध्ये दिसणार आहेत. त्यातच त्यांनी कुर्ता, पायजमा घातलेला आणि स्कार्फ गुंडाळला असल्यामुळे त्यांना ओळखताही येत नाही.