पुणे- सुतारवाडी येथे दि.5 सप्टेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बेवारस अवस्थेत सापडला होता. या व्यक्तीचा खून झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याप्रमाणे चतुश्रृंगी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुतारवाडी येथील रोहन लेहन लेबर कॅम्प परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना 5 सप्टेंबर रोजी सापडला होता. त्याच्याजवळ ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू आढळली नाही.
पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद करुन मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. या अहवालात संबंधीत व्यक्तीच्या गळ्यावर, पोटावर व बोटांवर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक देवरे करत आहेत.