पुण्यात धारदार शस्त्राने वार करत एकाचा खून; जाणून घ्या कारण

पुणे: व्याजाने घेतलेल्या पैशाचे व्याज दिले नाही याचा राग धरून धारदार हत्याराच्या साह्याने वार करून एकाचा खून करण्यात आला असून हि घटना कात्रज नवले ब्रीज दरम्यान सेवा रस्त्यावर रविवारी रात्री ११.३० वाजता घडली. शरद शिवाजी आवारे, वय ४३ वर्षे, राहणार संभाजीनगर, धनकवडी असे खून झालेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी प्रशांत महादेव कदम, वय ३१वर्षे राहणार धनकवडी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन प्रकाश शिंदे सह एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.