वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा बाईक चालवताना अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बाईक राईडिंग करत असताना हा अपघात झाला असून त्यांच्यासोबत बाईवर मुलगा सुद्धा होता. या अपघात शेन वॉर्न गंभीर जखमी झाला आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक चालवत होता. यादरम्यान तो खाली पडला आणि 15 मिटरपेक्षा जास्त तो जमिनीवर फरफटत गेला. अपघातानंतर वॉर्न व त्याच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात वॉर्नच्या मुलालाही दुखापत झाली आहे.
52 वर्षीय शेन वॉर्नला आपल्या पायाला आणि कमरेला मोठी दुखापत झाल्याची भीती होती. या भीतीने तो हॉस्पिटलमध्ये गेला. दरम्यान डॉक्टरांनी त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेले नसल्याचे सांगितले आहे. या गंभीर दुखापतीपासून तो बचावला असला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला प्रचंड वेदना होत होत्या. उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी शेन वॉर्नला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.