पुणे- प्रियकर-प्रेयसीच्या वादात प्रियकराच्या मित्राचा नाहक बळी गेला. ही घटना शुक्रवारी रात्री लोकमान्यनगर येथे घडली. प्रयसीच्या मामाने तलवारीने सपासप वार करत हा खून केला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राहुल वाळंजे यानी फिर्याद दिली आहे. तर महेश गायकवाड असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एक 22 वर्षीय तरुणी एका दागिण्यांच्या दुकानात काम करते. तर राहुल हा तीचा प्रियकर आहे. तीला वडिल नसल्याने तीचा संभाळ तीचे मामा करतात. मामांचा ऑफसेट प्रिटींगचा व्यवसाय आहे. संबंधीत तरुणीला तीच्या दुकानातील व्यवस्थापक गाडीवरुन घरी सोडताना राहुलने बघितले होते. याचा जाब तीला काल रात्री राहुलने लोकमान्यनगर येथे विचारला. त्याने केलेल्या शिवीगाळीमुळे ती भेदरली होती. तीने फोन करुन तीच्या मामांना बोलावून घेतले. यावेळी मामांचे आणि राहुलचे वाद झाले. ही भांडणे सोडवण्यासाठी राहुलचा मित्र महेश गायकवाडमध्ये पडला. त्याच्यावर रागाच्या भरात मामांनी तलवारीने सपासप वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन मृत झाला.