Maharashtra Lok Sabha Election| आगामी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र अद्याप महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटपाबाबत अद्याप कोणाताही अंतिम निर्णय झालेला नाही. सध्य महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र महायुती आहे. त्यांच्या जागा वाटपाबाबत अनेक बैठका होत आहेत.
यातच आता लोकसभा उमेदवारांची यादी शिंदे गटाने दिल्लीला पाठविल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा उमेदवारांची यादी शिंदे गटाने आता 48 जागांपैकी 13 जागा या शिवसेना शिंदे गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार शिंदे गटाच्या 13 उमेदवारांचा समावेश असलेली यादी काल रात्री दिल्लीत पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यमान उमेदवारांना उतरवणार रिंगणात
या यादीत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला किती जागा मिळणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आधी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती, या बैठकीत काही जागांवर उमेदवार बदलण्याबाबत अमित शाह यांनी सूचना केल्या होत्या, यानंतर शिंदे गटाने खासदारांची बैठक घेतली होती. त्यानुसार शिवसेनेच्या काही खासदारांना उमेदवारी नाकारून सक्षम अशा विद्यमान उमेदवारांना रिंगणात उतरविण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. Maharashtra Lok Sabha Election|
दरम्यान, शिवसेनेतील खासदारांच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 संभाव्य उमेदवारांची यादी भाजपच्या हायकमांडकडे पाठवली आहे. तर भाजपने यापूर्वी 20 जागांची घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या 48 तासात राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा:
“मोदी नाही, औरंगजेब म्हणा”, संजय राऊतांच्या टीकेला खुद्द मोदींनी दिले सडेतोड उत्तर