पुण्यात दुकानदारांवर कारवाईसाठी पालिकेने केली पथकांची नियुक्ती

पुणे – सुरक्षा नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर कारवाईसाठी पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकाने रोज केलेल्या कारवाईचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करायचा आहे. यासंबंधी आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी आदेश काढले.

 

यासाठी अतिक्रमण निरीक्षक, सहायक अतिक्रमण निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक असे एकूण तीन कर्मचाऱ्यांचे पथक प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार 15 पथके तयार करण्यात येणार आहेत.

 

सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने या आधीच कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, आता दुकानात होणारी गर्दी, त्याठिकाणी सुरक्षित अंतराचे पालन न होणे, ठराविक वेळेने केले जाणारे सॅनिटायझेशन, तसेच सॅनिटायझरची दुकानातील उपलब्धता, ग्राहकांना अंतर ठेवून उभे राहण्यासाठी केलेले मार्किंग या सगळ्या नियमांचे पालन होताना दिसत नाही.

 

हे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर गुरुवारपासून कारवाईला सुरुवात होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.