मुंबई – सांताक्रूझ मध्ये एका 20 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. या तरुणीने कुटुंबावर लग्नाच्या खर्चाचा भार पडू नये म्हणून आपली जीवन यात्रा संपवली आहे. तरुणीचे हे आत्महत्येचे कारण ऐकून कुटुंबीयांसह सर्वानाच धक्का बसला आहे.
घरची परिस्थिती आधीच हलाखीची त्यात करोनामुळे सततच्या लॉकडाऊनमुळे आणखीणच भर पडल्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनामोठा संघर्ष करावा लागत होता. हे सर्व तरुणीच्या डोळ्यादेखत घडत होते. असे असताना पालकांनी तीच्या लग्नाची तयारी सुरु केली. मात्र कुटुंबीयांवर आणखी आर्थिक भार पडू यासाठी तरुणीने आपलीच जीवन यात्रा संपवली आहे.
तरुणीचे वडील रिक्षाचालक आहेत, तर आई घरकाम करते. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज काढले. त्यामुळे तरुणीच्या शिक्षणासाठी हाती पैसाच उरला नाही. तिच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी वडिलांनी कसेबसे पैसे जमवले. उधार घेतलेली रक्कम परत करता यावी म्हणून तरुणीने एका कारखान्यात काम सुद्धा करत होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हे सर्व बघून तरुणीचे आई-वडील सुन्न झाले मात्र तरुणीच्या भावाने घडलेला हा प्रकार पोलिसांना सांगितला तेव्हा पोलिसह हे ऐकूण हेलावले. पुढिल तपास पोलिस करत आहेत.