हडपसर – ‘पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा’, ‘किस बाई किस, दोडका किस’, ‘हटूश रान बाई हटूश’, ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’, अशा मंगळागौरी खेळांच्या पारंपरिक गीतांवर आपले कौशल्य मंगळागौरी खेळांच्या ग्रुपने सादर केले. निमित्त होते नगरसेविका उज्वला सुभाष जंगले यांनी आयोजित केलेल्या मंगळागौर खेळांचे .
काळे- बोराटे नगर येथील शाळेत हा कार्यक्रम पार पडला. प्रभाग क्रमांक २३ च्या नगरसेविका व स्थायी समितीच्या सदस्या उज्वला सुभाष जंगले यांच्या वतीने महिलांसाठी मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ससाणेनगर, हडपसर गाव,काळे – बोराटे नगर, तुकाईदर्शन,पापडे वस्ती, भागातील महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला .महिलांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी कला संस्कृती ग्रुप चिंचवड या ग्रुपने मोलाचं सहकार्य केलं खेळामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
मंगळागौर हा श्रावण महिन्यातील खास स्त्रियांचा सण. पारंपरिक सण, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आजही मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे या खेळांचा आनंद महिलांना घेता आला नाही.
याशिवाय श्रावणात मंगळागौरीच्या खेळातून अनेक महिलांचे अर्थार्जनसुद्धा होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. लवकरच कोरोनाचे संकट नष्ट होऊन हा खेळ महिलांना पुन्हा खेळता येईल अशी आशा आहे. – उज्वला सुभाष जंगले नगरसेविका