मुंबई – येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून तब्बल 53 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याबाबतची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्याने बुधवारी दिली आहे.
इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाकडून ड्रग्जची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. अधिकाऱ्यांनी प्रवाशाला त्याच्या आगमनावेळी अडवले आणि त्याच्या सामानाची कसून झडती घेतली असता खोट्या पोकळ्यांमध्ये लपवून ठेवलेली 7.6 किलो ऑफ-व्हाइट पावडर जप्त करण्यात आली. नंतर, चाचण्यांमध्ये ही पावडर हेरॉईन असल्याचे निदर्षनात आले.
Weather Update : राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार; कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 53 कोटी रुपये असून याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला शुक्रवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.