मुंबई – शहरातील पवई परिसरातून भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आल्या असून जवानांकडून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुर आहेत.
मुंबईत साई ऑटो ह्युंदाईच्या सर्विस सेंटरमध्ये भीषण आग, व्हिडिओ pic.twitter.com/60beQZrlBE
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 18, 2021
पवई परिसरात असलेल्या साकी विहार रोडवर लार्सन अँड टुबरो कंपनीच्या समोर साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला लागलेल्या या आगीतून स्फोट सुद्दा होताना दिसून येत आहेत. आगीच्या धुराचे लोट दुरवर पसरले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.
या सर्व्हिस सेंटरमध्ये महागड्या कार असून लागलेल्या आगीमुळे त्या जळून खाक होऊन कोट्यावधीचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आगीमध्ये सुदैवाने अद्याप कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचे समजते.