नवी दिल्ली – मुंबईतील वसुली प्रकरणात फरार असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या ठावठिकाणाबाबत माहिती मागवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हणाले आहे की, त्यांनी आधी न्यायालयाला आपल्या ठिकाण्याबाबत सांगावे. हे सांगितल्या शिवाय न्यायालय कथीत खंडणी प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी न्यायालय त्यांच्या याचिकेवर विचार करणार नाही. असे सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितले आहे.
देशमुख यांची याचिका फेटाळली
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ज्यामध्ये त्यांनी सीबीआयला निर्देश देण्याची विनंती केली होती की, सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने त्याच्याविरुद्धचा प्राथमिक तपास रेकॉर्डवर आणण्यासाठी आणि कथित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती.