शहापूर – मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात माल वाहतूक ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर ट्रक नाशिकहून मुंबईच्या दिशेने गहू घेऊन जात होता. यावेळी कसारा घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाला. भरधाव ट्रकवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट शंभर फूट दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य, शहापूर आणि घोटी महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान खोल दरीमुळे मदत कार्यात अनेक अडचणी येत आहे.