मुंबई-बंगळुर महामार्गाच्या दोन्ही बाजूस 12 मीटरचा रस्ता

पिंपरी  – मुंबई-बंगळुर महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाकड ते ताथवडे पर्यंत 12 मीटरचे सेवा रस्ते विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार असून त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव आगामी महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाढीव हद्दीच्या विकास योजनेमध्ये वाकड येथील मुळा नदीपात्र ते ताथवडे हद्दीपर्यंत मुंबई-बेंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूस 12 मीटर रुंदीचे सर्व्हिस रस्ते प्रस्तावित आहे.

60 मीटर रुंद मुंबई – बंगळुर महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या वाकडमधील सर्व्हे क्रमांक 4 ते 10, 12, 121 ते 123, 130, 131, 135, 136, 137 तसेच 142, 143, 145, 146, 153, 156 ते 164 मधून हे सर्व्हिस रस्ते तयार करण्यात येणार आहेत. वाकडसह आयटीनगरीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हे रस्ते महत्त्वपूर्ण आहेत. तसेच हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रोच्या मार्गाकरीता या रस्त्यांचे भूसंपादन करणे आवश्‍यक असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियम व नवीन भूसंपादन अधिनियम 2013 नुसार भूसंपादनासाठी या रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा लागणार आहे. त्यासाठी महासभेची परवानगी आवश्‍यक आहे. त्यामुळे शहर सुधारणा समितीने याबाबतचा प्रस्ताव येत्या 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

खासगी गोशाळेला जागा देणार
चिखलीतील चंद्रभागा गोशाळा संवर्धन ट्रस्टकडून देशी गायींचे संगोपन केले जाते. या संस्थेकडे दुर्मिळ 30 देशी गायी आहेत. संस्थेच्या गोमाता संवर्धनाला विशेष योगदान म्हणून महापालिका संस्थेला जागा देणार आहे. चिखली येथील आरक्षण क्रमांक 1/19 हे क्षेत्र गुरांच्या गोठ्यासाठी आरक्षित आहे. या जागेत महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या नियंत्रणाखाली जागेचा ताबा ठेवून ही जागा चंद्रभागा गोशाळेला देण्यात येणार आहे. त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)