गायिका आणि टेलिव्हिजन स्टार नाओमी जुड यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. नाओमी यांच्या मृत्यू कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र त्यांच्या मुलींनी मानसिक आजारातून त्यांचा मृत्यू झाल्याचा माहिती देताना उल्लेख केला आहे.
‘आज मी आणि माझ्या बहिणीने एक अत्यंत त्रासदायक अनुभव घेतला. आम्ही आमची आई गमावली आहे. आम्ही अत्यंत कोलमडून गेलो आहोत. आम्हाला अत्यंत खोलवर दु:ख झाले आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही आणि जनता तिच्यावर किती प्रेम करते.’ नाओमी यांच्या मृत्यूची माहिती देताना त्यांची मुलगीआणि अभिनेत्री एशले जुड हिने याबाबत माहिती दिली.
कंट्री म्युझिक हॉल ऑफ फेम अँड म्युझियमने नाओमी जुडच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नाओमी यांनी नुकतीच फेअरवेल टूरची घोषणा केली होती. सँडबॉक्स लाइव्ह आणि लाइव्ह नेशन द्वारे निर्मित 10 दिवसांचा छोटा दौरा 30 सप्टेंबर रोजी ग्रँड रॅपिड्स, मिशिगन येथे सुरू होणार होता आणि 28 ऑक्टोबर रोजी नॅशविले येथील ब्रिजस्टोन एरिना येथे संपणार होता. मात्र त्याआधीच नाओमी यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
वृत्तानुसार 1980 आणि 1990 च्या दशकात जुड्स यांनी खूप साऱ्या सोलो गाण्यांची एक मालिकाच केली होती. ज्यामुळे सन 1994 मध्ये त्यांनी 12 गाण्यांचा एक अल्बम तयार केला. जो ग्रॅमी विजेता हिट व्हाई नॉट मी, मामा हीज क्रेजी यांसारख्या गाण्यांपेक्षाही अधिक लोकप्रिय झाला.