दुबई – अलिकडेच ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या शेरविन हाजीपूर या गायकाला इराणमध्ये ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माहसा आमिनी या युवतीवर केंद्रीत गीत गायल्याबद्दल शेरविन हाजीपूरला ही शिक्षा करण्यात आली आहे.
हिजाब व्यवस्थित परिधान न केल्याबद्दल इराणमधील नैतिक सुरक्षा रक्षकांनी २०२२ मध्ये माहसा आमिनी या युवतीला कोठडीमध्ये मारहाण केली होती. त्यात माहसा आमिनीचा मृत्यू झाला होता. त्याची प्रतिक्रीया म्हणून इराणमध्ये हिजाबविरोधी मोठे आंदोलन पेटले होते.
या आंदोलनाचे लोण परदेशात देखील पसरले होते. शेरविन हाजीपूरने माहसा आमिनला डोळ्यासमोर ठेवून एक राष्ट्रगीत तयार केले होते. देशाविरोधात प्रचार आणि सोकांना आंदोलन करण्यास चिथावणी दिल्याबद्दल त्याला ३ वर्षे आणि ८ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.