मुंबई – अभिनेत्री जान्हवी कपूर ही तरुण पिढीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आहे, जी तिच्या काळातील पहिली महिला सुपरस्टार आहे. दरम्यान अभिनेत्रीने एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे.
जान्हवी म्हणाली की, मी एकदा माझ्या वडिलांना खोटे बोलले होते मी चित्रपट पाहण्यासाठी जात आहे. त्यानंतर मी त्यांना न सांगता लास वेगासला गेले. तिथे दिवसभर फिरले आणि फ्लाइट पकडून सकाळी घरी पोहोचले. माझ्या वडिलांना याची कल्पनाही नव्हती. असे एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले आहे.
यावेळी जान्हवीने तिच्या डेटिंग लाईफबाबतचे गुपितंही उघड केली. ती म्हणाली, समोरच्या व्यक्तीला माझ्यात इंटरेस्ट आहे याची खात्री होईपर्यंत मी त्याच्यात इंटरेस्ट दाखवत नाही. त्याला स्वारस्य असेल तरच मी त्याला हिंट देते. मी लाजाळू स्वभावाची आहे आणि नात्यात माझ्या बाजूने कधीही पुढाकार घेत नाही. असेही अभिनेत्रीने सांगितले आहे.