जळगाव ( mucormycosis cases in maharashtra ) – जळगाव जिल्ह्यात करोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजराने सहा जणांचा बळी घेतला आहे तर एकूण 13 जण या आजाराने बाधित झाले असल्याची माहिती जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
करोना संसर्गामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने करोनामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस होत असल्याचे समोर आले आहे.
जळगाव जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. सद्यस्थितीत 13 रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 6जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 3 महिला रुग्णांचा समावेश आहे. आजही रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.