MSLTA Icon Tennis Tournament : ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन (१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात श्रेया पठारे, रिशीता पाटील यांनी, तर मुलांच्या गटात आराध्य म्हसदे, शार्दुल खवले यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना(एमटी),परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित श्रेया पठारेने तिसऱ्या मानांकित काव्या देशमुखचा २-६, ६-३, ६-३ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
Tumbling National Championship : जिम्नॅस्टीक स्पर्धेत पुण्याच्या साहिल व सौख्याचे यश….
चौथ्या मानांकित रिशीता पाटील हीने दुसऱ्या मानांकित अद्विता गुप्ताचा ६-४, ६-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित आराध्या म्हसदेने अर्जून वेल्लुरीचा ६-१, ६-४ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. बिगर मानांकित शार्दुल खवले याने दुसऱ्या मानांकित सक्षम भन्साळीचा ४-६, ६-२, ६-४ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.