Bollywood News : सीता रामम अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपल्या प्रतिभेच्या जोरावर टीव्ही ते चित्रपट असा प्रवास केला आहे. सीता रामम या चित्रपटातून मृणाल खूप नाव-प्रसिद्धी मिळाली. सध्या मृणाल तिच्या आगामी ‘आंख मिचोली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 27 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री मृणाल चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, प्रमोशन दरम्यान, मृणालने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा मृणालने केला आहे. ती कोणाला आपला आदर्श माणूस मानते हे देखील तिने सांगितले.
मृणालला लग्नासाठी घरच्यांचा दबाव आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला यावर तिने सांगितले,’ फैमिली प्रेशर आहे, पण कुणी भेटायला हवं ना, मी लग्नासाठी मुलगा शोधत आहे. मात्र, आयडॉल मॅनबद्दल बोलताना तिने सांगितले की, ‘तिला कॅनडाचा अभिनेता आणि संगीतकार कीनू रीव्हज आवडतो.’
मृणालच्या आंख मिचौली या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात मृणालची भूमिका एका मुलीची आहे जी रात्री पाहू शकत नाही. मृणालच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर, तिची सुरुवात टीव्हीपासून झाली. ती कुमकुम भाग्य या चित्रपटात दिसली होती. या शोमध्ये तिने लीड कॅरेक्टरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यानंतर तिने बाटला हाऊस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता मृणाल सतत तिच्या कामाने प्रभावित होत, आणि इंडस्ट्रीमध्ये तिचे पाऊल मजबूत करत आहे. मृणाल दक्षिणेतील चित्रपटांमध्येही सक्रिय आहे. आता ती Pippa, Hi Nanna आणि VD13 मध्ये दिसणार आहे.