मुंबई – दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ (Coffee with Karan) या शोचे आठवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच टीझर शोची घोषणा केली होती. या शोची सर्व शो हीट झाल्यानंतर पुढील पर्व पाहण्यासाठी चाहते देखील खुश आहेत.
येत्या 26 ऑक्टोबरपासून हा शो सर्व होणार आहे. या शोमध्ये आता कोणते पाहुणे मंडळी येणार याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Ranveer Sing) यावेळी शोमध्ये येणार असल्याचे म्हंटले जात आहे.
कॉफी विथ करणमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) दोघेही सहभागी झाले आहेत. पण प्रत्येक वेळी हे दोघे वेगळे आले आहेत. रणवीर सिंग सीझन 7 मध्ये आलिया भट्टसोबत आला होता. आता ही जोडी एकत्र दिसणार आहे. त्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
रणवीर सिंग आणि दीपिका व्यतिरिक्त कार्तिक आर्यन ‘कॉफी विथ करण 8’ मध्येही दिसणार आहे. द आर्चीज, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर सोबत अभिनयाच्या जगात प्रवेश करणारी सुहाना खान देखील कॉफी विथ करणमध्ये दिसणार आहे. तर सारा अली खान आणि अनन्या पांडे कॉफी विथ करणमध्ये एकत्र दिसणार आहेत.
कंगना रणौत देखील या शोचा एक भाग असू शकते, मात्र कंगना येण्याची शक्यता खूपच कमी आहे. यावेळी करीना कपूर आलिया भट्टसोबत शोमध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टी त्याचा मित्र अजय देवगणसोबत येणार आहे.