गुरुदासपूर – लोकसभा मतदारसंघात सनी देओल नेहमी चर्चेत असतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते निवडणून आले अन् तेव्हा पासून आजवर अनेक मुद्यांवरून ते चर्चेत आले आहे.
कधी स्वत:च्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्यामुळे तर कधी पंजाब मधील शेतकऱ्यांना पाठींबा न दिलेल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. निवडून आल्यावर त्यांनी त्यांचा मतदार संघ व मतदारांकडे पाठ फिरवल्याने परिसरात ठिकठिकाणी सनीचे बेपत्ता झाल्याचे बॅनर्स झळकले होते सनी देओल खासदार बनले असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कुठलीही जबाबदारी घेतली नसल्याचा राग लोकांच्या मनात आहे.
असं असतांना दुसरीकडे मात्र सनी देओलनं सुजानपूरचे आमदार दिनेश सिंह बब्बू यांना थार गाडी देण्यासाठी थेट महिंद्रा कंपनीला पत्र लिहिलं आहे. सुजानपूर मतदारसंघातील आमदार दिनेश सिंह ठाकूर उर्फ बब्बू यांच्या मुलीनं महिंद्रा थार गाडी बुक केली होती. ही गाडी आउट ऑफ टर्न देण्यासाठी खासदार सनी देओलनं कार उत्पादन करणारी कंपनी महिंद्राच्या अधिकाऱ्यांना शिफारस पाठवलं. प्राधान्याने थार गाडी आमदाराच्या मुलीला देण्याची व्यवस्था करावी अशी शिफारस त्यांनी पत्रातून केली होती. त्यामुळे आता ते पुन्हा चर्चेत आले आहे. पुन्हा एकदा त्यांच्यावर विरोधी नेत्यांकडून व सर्व सामान्यांनाकडून सनी देओलची खिल्ली उडवण्यात येत आहे.