लोणी देवकर – सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामांमध्ये शेतकरी वर्ग व्यस्त आहे. यामध्ये कोणी बैल जोडी किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची नांगरट शेतकरी करीत असतात; मात्र लोणी देवकर येथील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये शेतकऱ्याने चक्क महिंद्रा “थार’ गाडीने आपली शेती नांगरली आहे.
सध्या संपूर्ण राज्यभरासह इंदापूर तालुक्यात “थार’ या गाडीचे शेतकऱ्यासह युवकांमध्ये मोठे आकर्षण आहे. ही गाडी खरेदी करण्यासाठी तब्बल एक वर्षाहून अधिकचा काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. तेव्हा कुठेही गाडी खरेदीदाराला मिळते. यावरूनच त्या गाडीची सध्या लोकप्रियता लक्षात येत आहे.
अशा या गाडीने चक्क लोणी देवकर येथील शेतकरी अनिल मधुकर तोंडे या युवा शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील नांगरटीसाठी या गाडीचा उपयोग केल्याने तालुक्यात त्यांच्या या अनोख्या कृतीची चर्चा रंगली आहे. त्यांनी या गाडीने तब्बल एक दोन सऱ्या नव्हे तर जवळपास एक एकर क्षेत्र “थार’ या गाडीच्या साह्याने नांगरले आहे. गाडीला मागील बाजूस बैलाच्या साह्याने नांगरट करणारा नांगर दोरखंडाच्या साहाय्याने जोडून नांगरट केली.
या दणकट गाडीच्या साह्याने आपण शेती नांगरट करून पाहूया असा विचार मनात आल्याने त्यांनी जवळपास एक एकर क्षेत्राची नांगरट करून पाहिली. ट्रॅक्टरच्या तुलनेत गाडीने नांगरट करण्यास अधिकचा खर्च आला; परंतु गाडीची कार्यक्षमता पडताळले असता गाडी दणकट असून हा मी गाडी विषयी समाधानी आहे.
-अनिल तोंडे, शेतक