खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मागितलं ‘हे’ रिटर्न गिफ्ट

मुंबई – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कोश्‍यारी यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांचे आपल्या स्टाइलमध्ये अभीष्टचिंतन केले इतकंच नव्हे, तर राज्यपाल नियुक्‍त 12 आमदारांची नियुक्‍ती मार्गी लावून महाराष्ट्राला गोड भेट देण्याचे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्‍यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शुभेच्छा मात्र वेगळ्या ठरल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.