नागपुरातून तालिबानी समर्थक अफगाणी तरुणाला अटक

नागपूर – नागपूरमध्ये तालिबानी समर्थक असलेल्या अफगाणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. गेल्या 11 वर्षांपासून तो नागपुरात लपून राहत असल्याची माहिती आहे. नूर मोहम्मद असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

नूर मोहम्मद हा नागपूरमधील दिघोरी भागात छुप्या पद्धतीने राहत होता. त्या तरुणाच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीचे व्रण असल्याची माहिती नागपूर पोलीस आयुक्‍तांनी दिली आहे. तालिबानी अतिरिक्‍यांना सोशल मीडियावर फॉलो करत असल्याने त्याच्याभोवती संशय बळावला होता. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

नागपुरात नूर मोहम्मदचे आणखी काही साथीदार आहेत का? याचा शोधही घेण्यात येत आहे. या अफगाणी नागरिकाला परत अफगाणिस्तानला पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी दिली.

हा तरुण तालिबानी दहशतवाद्यांशी सतत संपर्कात होता की नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच सोशल मीडियावर तो ज्या तालिबानी दहशतवाद्यांना फॉलो करत होता, त्यांच्याशी त्याचा काय संबंध आहे? याबाबतही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.