मोरगाव, (वार्ताहर)- बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात उन्हाच्या झळया तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. तीव्र उन्हामुळे मोरगाव परिसरात थंड पेय व रसवंतीगृहे ग्राहकांनी फुलू लागली आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगाव, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी, मुर्टी, मोढवे, आंबी बुद्रुक काऱ्हाटी, जळगाव क. प. आदी परिसरात उन्हाच्या झळया तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. तप्त उन्हामुळे लहान मुलांसह, जेष्ठ नागरिक, तरुण वर्गाकडून थंडपेयांची मागणी वाढू लागली आहे. दिवसभर तप्त उन्हामुळे या भागातील रसवंती गृहे फुलू लागली आहेत.
मोरगाव चौकातील शीतपेयांच्या दुकानात व वाढ झाली आहे. वाढत्या उन्हाच्या झळयामुळे उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. जमीनीत पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. शीतपेयांच्या मागणीमुळे चहा – कॉफी व्यावसायिकांच्या धंद्यावर परिणाम झाला आहे.