कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील येवलेवाडी येथे विकास कामांतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कान्हे, नायगाव ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत येवलेवाडी येथे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या निधीतून ३० लक्ष रुपये निधी उपलब्ध करण्यात आला. त्यातून पवनानगर रोड ते येवलेवाडी साई बाबा मंदिरापर्यंतचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमास कान्हे नायगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विजय सातकर, उपसरपंच सुजाता चोपडे, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी चोपडे, रूपाली कुटे, मनीषा ओव्हाळ, सोनाली सातकर, पूजा चोपडे, संदीप ओव्हाळ, आरिफ मुलाणी, समीर सातकरस, अश्विनी शिंदे, येवलेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक धोंडीबा येवले, रघुनाथ येवले, अमोल येवले, चंद्रकांत येवले, शरद शिंदे आदी उपस्थित होते.
सरपंच विजय सत्कार म्हणाले की, विकास कामासाठी निधी कमी पडून देणार नाही. सुरू करण्यात येणारे रस्त्याचे काम हे दर्जेदार पद्धतीने असावे, आशा सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत. कित्येक वर्षे प्रलंबित असलेला येवलेवाडी येथील स्मशानभूमी लवकर सुरू करणार आहे. त्यासाठी लागणारा निधी मावळचे आमदार सुनील शेळके व ग्रामनिधीतून उपलब्ध करण्यात करण्यात येणार आहे.