बीजिंग – अमेरिकेच्या शेअर मार्केटमधून चीनी कंपन्यांना रोखण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेच्या सिनेटने या संदर्भातील एक विधेयक मंजूर केले आहे. सिनेटमधील रिपब्लिकन सदस्य जॉन केनेडी आणि डेमोक्रॅट पक्षाचे सदस्य ख्रिस व्हॅन हॉलन यांनी आणलेल्या या विधेयकाला बुधवारी सिनेटने एकमताने मंजुरी दिली. या विधेयकानुसार कंपनी परदेशी सरकारच्या मालकीची नाही किंवा त्यांच्यावर परदेशी सरकारचे नियंत्रण नाही, याचे प्रमाणपत्र कंपन्यांना सादर करणे आवश्यक असणार आहे.
सार्वजनिक कंपनी लेखा देखरेख मंडळाद्वारे त्याचा आढावा घेता येईल. असे लेखापरीक्षण त्यांना सादर करणे आवश्यक असेल. मात्र अशा लेखा परीक्षणास चीनने आक्षेप घेतला अहे. या कारवाईमुळे अलिबाबा ग्रुप होल्डिंग्ज लि. आणि बायू इंक या चीनी कंपन्यांना अमेरिकन स्टॉक एक्सचेंजमध्ये सहभागी होण्यास मनाई केली जाऊ शकते.