Fighter Movie : 26 जानेवारीला दरवर्षी अनेक देशभक्तिपर सिनेमे प्रदर्शित होतात. यंदादेखील ‘फायटर’ हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 26 जानेवारीला एखादा चांगला सिनेमा पाहायचा असेल ‘फायटर’ हा सिनेमा परफेक्ट आहे. ‘फायटर’ हा सिनेमा पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर कसं हवाई हल्ला करतं हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात अनेक ट्विस्ट अॅन्ड टर्न आहेत. हृतिक रोशन या सिनेमात वैमानिकाच्या भूमिकेत आहे. पण त्याचे सीनियर अनिल कपूर त्याच्यावर नाराज आहेत. दीपिका पादुकोणदेखील या सिनेमात वैमानिकेच्याच भूमिकेत आहे. एकंदरीतच हा सिनेमा देशभक्तिच्या रंगात रंगलेला दिसत आहे.
चित्रपटातील धमाकेदार गाणी अॅक्शन चाहत्यांची मने जिंकत आहेत. चित्रपट पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात मोठी गर्दी आहेत. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. लोकांना चित्रपटाची कथाही आवडली आहे.
‘फायटर’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता कमाई जोरदार होणार आहे, असे वाटते. या चित्रपटाची अनेक तिकिटे आगाऊ बुक करण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी ‘फाइटर’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल हे स्पष्ट झाले आहे.
‘फायटर’ भारतात पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये 25.00 कोटी रुपये कमवू शकतो. आगाऊ बुकिंगवर नजर टाकल्यास, चित्रपटाची 279367 तिकिटे आधीच विकली गेली आहेत, ज्यामुळे चित्रपटाने आधीच 8.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘फायटर’ देशभरात फक्त हिंदी भाषेत रिलीज झाला आहे.