पुणे :– डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत आयुश मिश्रा, सलिल देशपांडे, वैभव मालुकेड, कैवल्य जाधव, सुरज राठी आणि तन्मय जतकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी कामगिरी केली. डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या पुण्याच्या आयुश मिश्रा याने पुण्यातीलच संदीप जाजू यांचा १६-५३, ६०-१६, ३९-१९ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखानाचा सलिल देशपांडे याने मुंबईच्या हसन बदामी याचा ३८-२४, ४२-७३, ६५-५३ असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. निर्णायक फ्रेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात वैभव मालकुडे याने सिद्धार्थ टेंभे याचा २९-३१, ५७-१०, ३९-१४ असा पराभव करून आगेकूच केली. कैवल्य जाधव याने डेक्कन जिमखानाचा प्रशांत पवार याचा २३-३४, ६२-०७, ४२-११ असा पराभव करून विजयी कामगिरी केली.
Australian Open 2024 : सुमित नागलचे आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरीत चिनी खेळाडूकडून पराभव…
पुना क्लबच्या सुरज राठी याने मुर्तझा अझदर याचा २७-३६, ५७-०२, ४२-१३ असा तिसर्या फ्रेममध्ये पराभव केला. पुण्याच्या तन्मय जतकर याने डेक्कन जिमखानाच्या सचिन बिचे याचा ४५-०१, ३६-४६, ३०-१८ असा पराभव करत संघर्षपूर्ण विजय मिळवला. तहा खान याने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत समकीत परमार याचा २४-३५, ५९-३१, ४६-०८ असा पराभव केला. विजय नचानी याने संदीप जाजू याचा ५६-०, ७२-२४ असा सरळ फ्रेममध्ये पराभव केला. नितेश माने याने हसन सय्यद याचा २६-२१, ५९-२६ असा पराभव करून आगेकूच केली.